top of page
Writer's pictureSachin Waykar

चिनी गुलाब : इवलेसे सौंदर्य

चिनी गुलाब (किंवा China Rose किंवा Portulaca) म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे छोटेसे रंगीबेरंगी सुंदर असे गुलाबासारखे दिसणारे नाजूक फूल. आमच्या गावी जुन्नरला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेल्यावर एकदा या इवल्याश्या झाडावर माझी नजर पडली आणि मी मोहीतच झालो. लागलीच त्याची एक कांडी मी मुंबईला आणून माझ्या बागेतल्या कुंडीमध्ये हौसेने लावली. या रोपाचे वैशिट्य हेच की मधमाशा आणि फुलपाखरे या कडे आकर्षित होतात. लाल, पिवळा, केशरी, सफेद, गुलाबी अशा अनेक विविध रंगांमध्ये ही वनस्पती आढळून येते. चला तर मग या लेखात आपण चिनी गुलाबाविषयी माहिती घेऊयात.




कसे लावाल ?

लागवडीस अतिशय सोपी अशी हि गवत किंवा झुडूप वर्गीय वनस्पती असून अगदी छोट्याशा जागेत सुंदर फुले देणारी वनस्पती ही याची खासियतआहे. पावसाळा संपला की चिनी गुलाबाची काडी माती मध्ये टोचल्यास हे झाड लगेच तग धरेल. याचे बी देखील उपलब्ध आहे पण बिया पासून लावल्यास फुले येण्यास बराच कालावधी जातो.

सहा ते आठ इंचाच्या कुंडीमध्ये काडी द्वारे हे झाड सहज लावता येते. वाळूमिश्रित माती, शेणखत यांचे मिश्रण करून कुंडी भरून घ्या. कुंडी पसरट असल्यास झाड खूप लवकर कुंडीतील जागा व्यापून टाकते. झाड लावताना कुंडीला ५ ते ६ छिद्रे पाडून घ्या. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पहिले त्या कुंडीमध्ये खडीचा एक थर पसरा. नंतर माती, शेणखत, गांडूळ खत, नदीतील बारीक वाळू, निंबोळी पेंड यांचे मिश्रण बनवून घ्या. मिश्रणाने कुंडी भरून घ्या. मग कुंडीमध्ये चिनी गुलाबाची काडी घेऊन कुंडीतील मातीमध्ये १- १.५ इंच इतकी खोल ची जागा करून त्यात चिनी गुलाबाची काडी लावा. माती कडेने दाबून घ्या. माती जर उपजाऊ असेल तर फुले छान येतात. वेगवेगळ्या रंगाच्या काड्या एकाच कुंडीत लावल्यास कुंडी रंगीबेरंगी फुलांनी भरून जाते.


सूर्यप्रकाश

चिनी गुलाबाच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. या झाडाला कमीतकमी ४ ते ८ तास उन्हाची गरज असते. चार तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश असेल तर फुले येणारच नाहीत किंवा कमी येतील. आधीच्या लेखात सांगितल्या प्रमाणे जास्त सूर्यप्रकाश तर जास्त फुले हे लक्षात असू द्या. कडक उन्हाळ्यात दुपारचे ऊन नाही दिले तरी चालेल. सूर्यप्रकाश कमी असेल तर फुले येणारच नाहीत किंवा आकाराने लहान येतील.



पाणी

जास्त प्रमाणात घातलेले पाणी या झाडाचा शत्रू आहे. कुंडीत पाणी जास्त झाले तर याची मुळे सडतात आणि झाड दगावते. चिनी गुलाबाच्या पसरत्या वेली सारख्या नाजूक फांद्यामध्ये पाणी असते, त्यामुळे कमी पाणी केव्हाही चांगले. म्हणूनच पावसाळ्यामध्ये चिनी गुलाब जास्त टिकत नाही. याकरिता पावसाळ्यामध्ये चिनी गुलाबाची कुंडी पावसापासून दूर ठेवावी.


खते

तसे पाहता या झाडाला खताची तशी आवश्यकता नाही परंतु भरपूर सूर्यप्रकाश असून देखील फुले येत नसतील तर गांडूळ खत किंवा व्हर्मी वॉश घालू शकता त्यामुळे बहर टिकून राहतो. कुंडी भरताना भरपूर शेणखत आणि गांडूळ खत टाकल्यास भरपूर फुले येतील. आणि तरीदेखील फुले येत नसल्यास पोटॅशयुक्त खतांचा वापर करू शकता किंवा कांद्याचे पाणी आणि केळ्याच्या वाळलेल्या सालीचे खत वापरू शकता. उत्तम परिणाम दिसेल.



किडींचा प्रादुर्भाव

या झाडाला फार कमी किडींचा प्रादुर्भाव होतो. तरीही काही प्रमाणात मावा होण्याची शक्यता असते . तसे झाल्यास कडुनिंबाच्या अर्काची फवारणी करावी.


महत्वाच्या टिप्स

  • योग्य प्रमाणात पाणी

  • पसरट कुंडी

  • भरपूर सूर्य प्रकाश

  • फुले येऊन गेल्यावर वेळोवेळी छाटणी

वरील गोष्टी अमलात आणल्यास चिनीगुलाबाला भरघोस फुले येतील आणि अनेक पाहुणे तुमच्या बागेत भेट देतील. चला तर मंडळी वाट कसली बघताय !



Recent Posts

See All

3 Comments


ameynt4
May 23, 2021

Beautifully

Like

dhanajiy111
Oct 19, 2020

Very nice Sachin

Like

sneha.a.khandagale
Oct 11, 2020

Beautifully explained..... And great information.,.

Like
Post: Blog2_Post
bottom of page